सेलिब्रिटी बाप्पा

Sonalee Kulkarni : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी बाप्पाचं आगमन

गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसते.

Published by : Siddhi Naringrekar

गणरायाच्या आगमनाने सर्वत्र भक्तिमय वातावरण दिसते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी रोषणाई करण्यात आली आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे म्हणत घरोघरी गणपती बाप्पाचं आज आगमन होईल. बाप्पाचं आगमन हा प्रत्येकासाठी अत्यंत आनंदाचा दिवस असतो. सगळीकडे उत्साहाचे वातावरण आहे. राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे म्हणत घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन होत आहे.

याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरी बाप्पाचं आगमन झालं आहे. सोनाली दरवर्षी तिच्या भावासोबत स्वतः बाप्पाची मूर्ती साकारत असते. याचा व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

यासोबतच माध्यमांशी बोलताना सोनाली कुलकर्णी म्हणाली की, सगळ्यांच्याच आयुष्यात गणेशोत्सवामुळे वेगळाच चैतन्य, वेगळाच आनंद निर्माण होतो. मंगलमय वातावरण निर्माण होते आणि हा सण आपल्या सगळ्यांचा अत्यंत लाडका आहे आणि गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचा लाडका आहे. बाप्पाचे आगमन झालेलं आहे.

प्राणपतिष्ठापना, पूजा, आरती झालेली आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे खूप आनंद होत आहे. बाप्पा आल्या आल्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो तो वर्षभर टीकून राहो आणि आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात जी विघ्न आहेत ती दूर होवो. तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. असे सोनाली कुलकर्णी म्हणाली.

माहीम विधानसभेत भाजपचा अमित ठाकरेंना पाठिंबा

Nilesh Rane Kudal Malvan Constituency : निलेश राणे पुन्हा गड काबीज करणार?

बीड: परळी विधानसभा मतदारसंघात धनंजय मुंडे, राजेसाहेब देशमुख आणि राजेभाऊ फड यांचा उमेदवारी अर्ज वैध

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर

Dinesh Pardeshi Vaijapur Assembly Election; पहिल्यांदाच निवडणूक लढवणार